Microsoft Windows 11 : डिझाईन आणि स्टार्ट मेन्यू बदललं, 'हे' आहेत Windows 11 चे नवीन फीचर्स
Microsoft Windows 11 : तब्बल सहा वर्षांनी मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोजमध्ये अपडेट्स करत Windows 11 च्या रुपात नवीन ऑपरेटिंग सिस्टिम लॉन्च केली. या विंडोजमध्ये अनेक नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत. फ्रेश लूक, नवीन थीम, वेगळं स्टार्ट बटन, मायक्रोसॉफ्ट सेंटर आणि बऱ्याच नवीन सुविधा या Microsoft Windows 11 मध्ये देण्यात आल्या आहेत. या आधी मायक्रोसॉफ्टमध्ये डाव्या बाजूला असणारा स्टार्ट मेन्यू आता Windows 11 मध्ये मध्यभागी असणार आहे. मायक्रोसॉफ्ट टीम्स या नव्या विंडोजमध्ये जोडण्यात आल्याने व्हिडीओ कॉल्स आणि मेसेज करणे अधिक सोपं होणार आहे. तसेच विंडोज अपडेटची साईजही कमी करण्यात आली असल्याने डाऊनलोड करणं अधिक सुलभ होणार आहे. स्टार्ट मेन्यू आता मध्यभागी आणल्याने या विंडोजमधील अॅप्स किंवा इतर फाईल्स या वेगाने सर्च केल्या जाऊ शकतील. तसेच स्टार्ट मेन्यूमधील विजेट्स आता स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. महत्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये मायक्रोसॉफ्ट स्टोअर देण्यात आलं असून त्यावर अनेक अॅप्स उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यामुळे डाऊनलोड करताना सुरक्षितता वाढली आहे. Microsoft Wi...




